Ek Niragas Swapna

चुकतोय मी, कळतय मला,
शब्दांनी माझ्या दुखवतोय तुला.

पण करू तरी काय तूच सांग ग,
शिष्ट शिवाय खडूस कसा राहील ग.

तुझ्या शिवाय दोन दिवस दोन शतके वाटतील.
प्रत्येक क्षणात तुझीच आठवण छळत राहील.

म्हंटले जरी असेल मी,
सोबत तुझ्या येणार नाही.
पण तुझ्याशिवाय असण्याची,
कल्पनाही आता करवत नाही.

मला बोलायला जमेल हे जरा अवघडच वाटतय,
मनातलं सगळं ओठांवरच येऊन थांबतय.

बघून या डोळ्यांत,
डोकावून माझ्या सत्यात,
घेऊन हात हातात,
रंगशील का माझ्या प्रेम रंगात?
तुझ्या खोटया खोटया नवऱ्याचं तुझ्यात खरं खरं गुंतणं,
बघ चंद्र चांदण्यांनाही भुरळ पाडतेय आज.

फक्त माझी रडकी बाहुली नाही तर सत्यात उतरलेल एक निरागस असं स्वप्न आहेस तू.
आयुष्यभर प्रेमात अडकडायला नाही म्हणणारं मन आज मला म्हणतय एकदा फसूण तर बघू!

💜

Subscribe
Notify of
guest
1 Comment
Most Voted
Newest Oldest
Inline Feedbacks
View all comments
Rutuja Kosode
Rutuja Kosode
10 months ago

💜

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x