शब्द जरी महत्त्वाचे असले तरी सर्वस्वी ऐकायचे नसतात,
कधी कधी, शब्द बाजूला ठेवून त्यामधील भाव समजायचे असतात.
म्हटले जरी असेल तिने, लक्ष अभ्यासात लागत नाही,
तू कितीही समजावले तरी डोक्यात तिच्या जात नाही.
एक क्षण थांबून विचार तू केला नाही,
की ती असेही म्हणाली होती की तू समोर असल्यावर काही दुसरे तिला दिसत नाही.
प्रेम तिच्यावर करू शकत नाही, हे तू बोलून बसलास,
तुझ्या या एका वाक्याने तिच्या मनाला इजा करून बसलास.
तिच्यासारखी बायको मिळायला भाग्य लागतं,
याची जाणीव असूनही तुझं डोकं वारंवार तिला दुखवत बसतं.
गेली ती निघून आता, करणार तू आहेस काय?
ज्या खोलीत नसेल तिचा सहवास, कसे टिकणार तिथे तुझे पाय?
जितका वेळ जाईल… तिच्याशिवाय जाईल,
गोष्टी तुला उमगत जाईल.
तिच्याशिवाय असणे… जमणार तुला नाही,
दरवाज्याकडे टक लावून बसतील तुझे डोळे… पण ती मात्र दिसणार नाही
चुकांची जाणीव प्रत्येक क्षणी तीव्र होत जाईल.
आम्हालाही बघायचे आहे, कसा बरं तू तिला परत आणशील!
💜