Netra – The Abandoned Child

हातात होती बाहुली,
आणि डोळ्यात पाणी.
घेऊन मागे पळता पळता पडली ती खाली,
पण तोपर्यंत निघून गेली होती तिची आई.

रुसली. रडली. ओरडली.
पण आई परत येणार हे मनाशी घट्ट धरून बसली.

दिवसा मागून दिवस गेले,
आठवड्या मागून आठवडे.
पण जेव्हा महिने उलटायला लागले,
तेव्हा तिला सत्य उमगायला लागले.

रोज रात्री रडायची,
प्रत्येक क्षणात आईची आठवण काढत बसायची.

काही केल्या कळेना,
आई तिला सोडून गेली का?

आजारी पडायची तेव्हा विचार करायची,
आई होती तेव्हा किती प्रेमाने गोंजारायची.

जसे दिवस जात गेले,
दुःखाला तिरस्कार बनवत गेले.

आपल्या आईने आपल्याला सोडून एका दुसऱ्या मुलीला जवळ केले,
हे जेव्हा कळले, जे थोडे फार प्रेम शिल्लक होते तेही संपले.

आईचा राग सगळ्यांवर काढला,
सर्व काही सोडून फक्त अभ्यासाचा ध्यास धरला.

अभ्यास – नोकरी – अभ्यास,
बस इतकेच ठेवायचे होते तिला आयुष्यात.

पण आला कोणीतरी आणि हरवून बसली त्यात स्वतःला,
नकळतच एका सुखी आयुष्याचे स्वप्न लागली रंगवायला.

ब्रश हातात घेतलाच होता जेव्हा लागून कोणाचा पाय, सगळे रंग सांडले,
अगदी काहीच क्षणात तिचे आयुष्य पुन्हा एकदा विस्कटले.

नजर वर गेली तेव्हा लक्षात आले,
ज्या मुलीसाठी तिच्या आईने तिला स्वतः पासून दूर केले, त्याच मुलीने होते तिचे प्रेम तिच्या पासून हिरावून घेतले.

शशांक सारखा कोणी,
तिने बघितला नव्हता कधी.
जो ती चिडल्यावरही,
संयमाने तिची समजूत काढी.

पण आयुष्यात परत आली अपूर्वा,
आणि पुन्हा एकदा… सर्व काही हरवून बसली नेत्रा.

नेत्रा उद्धट आहे, आज म्हणतात सगळे,
तिचे एकटेपणाच्या पावसात चिंब भिजलेले बालपण कुठे त्यांनी पाहिले!

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

This has been written solely and solely from Netra’s point of view. It’s how she sees her universe that was shattered years ago by the hands of her mother in her opinion.

Do I like Netra? Unfortunately not much. Not right now.

Am I justifying Netra? Absolutely not.

I am just trying to understand where Netra comes from. Precisely what makes her who she is today. 💜

Subscribe
Notify of
guest
2 Comments
Most Voted
Newest Oldest
Inline Feedbacks
View all comments
Soham naik
Soham naik
2 years ago

Wonderful writing I personally feel that…😊👍👌😍😍😍

2
0
Would love your thoughts, please comment.x
()
x