Shishta Bahuli’s Khadoos Teddy – Thipkyanchi Rangoli

झोपताना लागायचा तिला तिचा teddy,
का… याचा फारसा विचार तिने कधी केला नाही.

तिच्या teddy सोबत झोप अगदी सहज यायची तिच्याकडे,
त्या teddy ने होते तिचे सगळे उन्हाळे-पावसाळे पाहिले!

तिचा teddy आणि ती – तिच्यासाठी perfect असे combination होते,
पण कधी, कुठे, कसे तिच्या नवर्‍याने तिच्या teddy च्या जागी स्वतःला उभे केले हे होते न सुटणारे कोडे!

आधी Teddy शिवाय झोप लागायची नाही,
पण Khadoos भेटल्यावर त्या Teddy ची कधी गरजही भासली नाही आणि आठवण तर अजिबातच आली नाही.

कधी बसुन विचार केला तर कदाचित उमगेल तिला,
Teddy नाही कायम एक सहवास हवा होता तिला.
असा सहवास ज्यात एक विलक्षण शांतता असेल,
ज्या शांततेत तिचे मन स्थिर होऊ शकेल.

कधी बसुन विचार केला तर कदाचित उमगेल तिला,
Teddy नाही कायम एक स्पर्श हवा होता तिला.
असा अलगद स्पर्श ज्यात एक विलक्षण माया असेल,
ज्या स्पर्शात तिची स्पंदने त्यांची मूळ गती शोधू शकेल.

Khadoos Teddy कुठून भेटला शिष्ट बाहुलीला काय माहिती,
कदाचित म्हणुनच म्हणतात, आधीच ठरलेल्या असतात शतजन्माच्या गाठी!

💜

I think I have talked a lot about Apurva-Teddy-Shashank in a couple of my reviews. Just tried to put it in a small poem here. 💜

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments
0
Would love your thoughts, please comment.x
()
x