माझे शब्द मी न बोलताही ऐकू शकतोस असे बोलला होतास तू,
माझ्या मनातल्या गोष्टी वाचू शकतोस असे बोलला होतास तू.
मग असे काय झालेय की आज माझे शब्द तुला खोटे वाटतात आहे आणि मी पण … खोटी,
काय विचार करत होतास तू जेव्हा तू म्हणालास मला अप्पलपोटी!
रोज रात्री माझा teddy बनून, कधी तुझ्या हातावर तर कधी मला तुझ्या मिठीत घेऊन झोपतो,
आणि तरीही का प्रत्येक वेळी तू मला ओळखण्यात चुकतो?
तुझे शब्द मला दुखवत गेले पण तरीही मी सगळे विसरत गेले,
तुझ्याबद्दलच्या माझ्या भावना जरी त्याच असल्या तरी तुझ्या अविश्वासाने त्यांना आज हतबल आहे करून सोडले.
का नाही बघू शकत तू मला मी जशी आहे तशी?
का तू बनवून बसला आहेस माझ्याविषयी एक निरर्थक कल्पना अशी!
मी थकत चाललीये आता,
प्रेमाच्या बागेत फुले कमी आणि जास्तं लागतोय तो काटा.
तू काय करशील, कसे करशील, नाही मला माहीत,
घालणे माझ्या मनाची समजूत होईल सोपे नाही.
जर हवी असेल मी तुला परत तुझ्या मिठीत,
तर बघू दे मला किती प्रामाणिकता असेल तुझ्या sorryत!
– Mrs. Kanitkar